- September 15, 2023
- No Comment
दुचाकी चोरणारे व घरफोडी करणा-या आरोपी कडुन चोरीच्या एकुण १४ दुचाकी वाहने व घरफोडीतील सोने व रोख रक्कम असा एकुण ७ लाख रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत, करुण एकुण १२ गुन्हे उघडकीस
मुंढवा मधील चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस वाहनाचा व अज्ञात आरोपींचा तपास पथक प्रमुख श्री. संदीप जोरे व स्टाफ हददीत गस्त करीत शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार दिनेश भांदुर्गे व सचिन पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की दोन मुले संशयीत रित्या काहीतरी अपराध करण्याचे इराद्याने चोरीची दुचाकी घेवुन साज कंपनी जवळ घोरपडी गाव या ठिकाणी फिरत आहेत. सदरबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णु ताम्हाने यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. बातमीप्रमाणे तपास पथकातील अधिकारी अंगलदार यांनी सदर ठिकाणी जावुन संशयीत आरोपीस थांबवुन त्यांचे ताब्यातील मोटार सायकल बाबत त्यांनी खात्रीलायक माहीती न दिल्याने त्याबाबत संशयआला असता त्यांचे ताब्यातील वाहन हे मुंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. ३०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ मधीलचोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस असल्याचे निष्पन्न झाले. सदर वाहनावरील आरोपी नामे गोरख विलास धांडे,वय-२० वर्षे, रा. शिवशंभो नगर, लेन नं ४, इस्कॉन मंदीर चौक, गोकूळ नगर, कात्रज, पुणे व त्याचा साथिदार विधीसंघर्षित बालक याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचेकडुन एकुण १४ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झालेने ते जप्त करुन त्यांचेकडुन कोंढवा पोलीस ठाणे हददीतील घरफोडीतील सोने व रोख कॅश असा ७,०००,००/-रु (७ लाख रु. ) चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या १४ दुचाकी गाडयांपैकी ११ गाड्यांबाबत पुणे शहर व परीसरातील पोलीस ठाणेत गुन्हे दाखल असुन इतर ०३ जप्त वाहनांबाबत अधिक तपास सुरु आहे. वरील गुन्हे हा अटक आरोपी व त्याचा जोडीदार विधीसंघर्षित बालक यांनी केले आहेत. अटक आरोपी नामे गोरख विलास धांडे, वय-२० वर्षे,रा. शिवशंभो नगर, लेन नं. ४, इस्कॉन मंदीर चौक, गोकूळ नगर, कात्रज, पुणे असे असुन त्याचे वरघरफोडीचे ०२ गुन्हे दाखल आहेत.