• September 15, 2023
  • No Comment

रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाईल हिसकावुन नेणा-या टोळीस केले जेरबंद

रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाईल हिसकावुन नेणा-या टोळीस केले जेरबंद

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने युनिट-०४ कडील पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, अजय गायकवाड व सारस साळवी यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, साईबाबा मंदीर,जुना पुणे-मुंबई हायवे रोडवर बोपोडी मेट्रो स्टेशन जवळ तीन इसम चोरी केलेले मोबाईल कमी किंमतीत विकत आहेत.

सदर बातमीचे अनुशंगाने पथकाने बातमीच्या ठिकाणी जावून त्यांना पकडले असता, त्यांचेकडे एक स्कुटर मिळून आली, सदर स्कुटरची झडती घेता, त्याचे डिकी मध्ये वेग-वेगळ्या कंपनीचे एकुण १२ मोबाईल फोन व ०१ चाकु मिळून आला. त्यांना त्यांची नावे व पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १ ) किशोर उत्तम गायकवाड २)अजय ऊर्फ ओमकार सुरेश गाडेकर ३) आशिष ऊर्फ बोना संतोष सोजवळ असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे सदरबाबत चौकशी करता, त्यांनी सदरचे मोबाईल पुणे व पिंपरी -चिंचवड भागात तसेच
पुणे-बेंगलोर हायवेवर रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या लोकांना चाकुचा धाक दाखवून, त्यांचेकडून जबरदस्तीने हिसकावुन चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी करता, त्यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार हे हॅरिस ब्रिज जवळ बोपोडी येथे थांबलेले असून, त्यांचेकडे देखील काही चोरीचे मोबाईल फोन आहेत असे सांगितलेने, सदर आरोपींना त्यांचेकडील मिळालेल्या मोबाईल फोन व स्कुटरसह हॅरिस ब्रिजजवळ बोपोडी येथे गेले असता तेथे
त्यांचे दोन साथीदार नामे ४) जॉर्ज डॉम्निक डिसोजा ५) साहील ऊर्फ साहील्या सलीम शेख असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात वेग-वेगळ्या कंपनीचे ०८ मोबाईल फोन मिळुन आले. तसेच त्यांचे ताब्यात एक मोटार सायकल मिळुन आली. सदर दोन्ही वाहनाचा उपयोग ते रात्री एकटे जाणा-या लोकांना अडवून त्यांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन चो-या करण्यासाठी करत असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेले आरोपी १ ) किशोर उत्तम गायकवाड, वय १९ वर्षे, रा. स. नं. २४, कमलाबाई बहीरट
चाळ, बोपोडी, पुणे २) अजय ऊर्फ ओमकार सुरेश गाडेकर, वय – २१ वर्षे, रा.स.नं. २४, बोपोडी पुणे ३) आषिश ऊर्फ बोना संतोष सोजवळ, वय-२४ वर्षे, रा.स.नं. २४, सावंत नगरीजवळ, बोपोडी पुणे ४) जॉर्ज डॉम्निक डिसोजा, वय-१९ वर्षे, रा.स.नं. २४, सम्राट अशोक नगर, पवळे चाळ, बोपोडी, पुणे ५) साहील ऊर्फ साहील्या
सलीम शेख, वय- १९ वर्षे, रा. इंदीरानगर वसाहत, घर नं. २, खडकी बाजार, खडकी, पुणे यांचेकडून एकुण २० मोबाईल फोन, ०१ धारदार चाकु तसेच गुन्हयात वापरलेली ०१ अॅक्टिव्हा स्कुटर, ०१ बजाज पल्सर गाडी असा एकुण रु.४,१५,२००/- किचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *