- September 18, 2023
- No Comment
गणेशोत्सवादरम्यान पुणे पोलिस ॲक्शन मोडवर; 2 हजार 544 गुन्हेगारांची तपासाणी
पुणे : गणेशोत्सव, तसेच ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री शहरातील गुंडाची झाडाझडती घेतली. पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात कारवाई करुन गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सराईतांविरुद्ध कारवाई करण्यासाठी रविवारी मध्यरात्री विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन)राबवून गुंडांची तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा, तसेच विविध पोलीस ठाण्यातील पथके या मोहिमेत सहभागी झाले होते. गुन्हेगार राहत असलेल्या भागाची पाहणी करण्यात आली. दोन हजार ५४४ गुंडांपैकी ७१७ गुंड मूळ पत्त्यावर राहत असल्याचे आढळून आले