• September 21, 2023
  • No Comment

मौजमजेकरीता वाहनचोरी करणा-या आरोपीकडून १४ वाहने जप्त. हडपसर तपास पथकाची कामगिरी

मौजमजेकरीता वाहनचोरी करणा-या आरोपीकडून १४ वाहने जप्त. हडपसर तपास पथकाची कामगिरी

    पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने,त्याबाबत कारवाई करणेबाबत गुन्हेशाखा व सर्व पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे दरोडाव वाहनचोरी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी आरोपी नामे मुजफ्फर ऊर्फ सलमान रफिक पठाण वय २६ वर्ष रा. घुलेनगर साईकृपा बिल्डींग मांजरी खुर्द हडपसर पुणे / संत तुकाराम नगर भोसरी पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून पुणे शहरातील ८ वाहनचोरीचे गुन्हे उघड केले होते.

    आरोपी मुजफ्फर ऊर्फ सलमान रफिक पठाण यास हडपसर तपास पथकाने, हडपसर पोलीस
    ठाणे गु.र.नं.१३७४/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात वर्ग करून घेवून त्याचेकडे तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, शाहीद शेख,प्रशांत दुधाळ,निखील पवार, अतुल पंधरकर भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड असे तपास करीत असताना आरोपी याने आणखी ०६ वाहनचोरीचे गुन्ह्यांची कबुली दिली. हडपसर तपास पथकाने आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण ०६ गुन्हे उघडकीस झाले असून किं.रू २,८०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये १ होंडा युनिकॉर्न,०१ बजाज पल्सर, ०१ स्प्लेन्डर,
    ०१ स्पलेंन्डर, ०१ ग्लॅमर, ०१ होंडा शाईन, आणी ०१ ड्रीम युगा अशा ०६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उघडकीस आलेले गुन्हे आणि पो.स्टे. पुढीलप्रमाणे. हडपसर पोलीस ठाणे ०२, लोणीकाळभोर पोलीस ठाणे ०२, वाकड पोलीस ठाणे ०१, पिंपरी पोलीस ठाणे ०१ असे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
    आरोपी हा वाहनचोरी करताना बसने घरातुन निघत असे तसेच वाहनचोरी केल्यानंतर त्याच वाहनावर बसून निघून जात असे. जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसेल ही शक्यता गृहीत धरून तो अंगावर ८ ते १० वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालत असे जेणेकरून त्याचा सीसीटीव्ही आधारे शोध घेताना अडथळे निर्माण होतील. सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती
    अश्विनी राख,यांचे मागदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री.
    रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे), श्री संदीप शिवले,
    यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश
    शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर,भगवान
    हंबर्डे,अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, यांचे पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *