• September 21, 2023
  • No Comment

तीन महिन्यांच्या काळात तीन वेळा एटीएम मशीन उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न तीन जणांना अटक

तीन महिन्यांच्या काळात तीन वेळा एटीएम मशीन उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न तीन जणांना अटक

    पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा युनिटच्या अधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी गेल्या तीन महिन्यांच्या काळात तीन वेळा एटीएम मशीन उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ते तिघे तिसऱ्यांचा एटीएम उडवण्याचा प्रयत्न करता असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना अटक केली.

    विशाल छबू पाल्हारे (वय 20), अनिकेत संजय शिंदे (वय 20) आणि आदित्य प्रदीप रोकडे (वय 20)अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी विशाल आणि अनिकेत हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून आदित्य हा पुण्यातील शिरूर येथे राहणारा असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिनही आरोपींनी पैसे मिळवण्यासाठी पुणे- अहमदनगर हायवेवरील पारगाव येथील इंडिया वन कंपनीचे एटीएम मशीन उडवण्याचा प्रयत्न केला होता
    मे महिन्यात हे एटीएम उडवण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर यावत पोलिस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आली होती. स्फोटकांचा वापर केल्यानंतरही एटीएम उडवण्यात आरोपींना अपयश आले होते. त्यानंतर 6 जुलै आणि 26 जुलै रोजी आरोपींनी सेम पद्धत वापरून पुन्हा एटीएम उडवण्याचे दोन प्रयत्न केले खर पण त्यातही ते अपयशीच ठरले. यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात दोन वेगळ्या एफआयआर दाखल करण्यात आल्या.

    वारंवार घडणाऱ्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा युनिटच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. त्यानंतर सीसीटीव्ही फूटे तपासले असता, त्या आधारे पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *