• September 18, 2023
  • No Comment

लोणीकंद पोलीसांनी दरोडा टाकणा-या टोळीतील आरोपीस केले गजाआड

लोणीकंद पोलीसांनी दरोडा टाकणा-या टोळीतील आरोपीस केले गजाआड

    दरोडा टाकणाऱ्या टोळीतीआरोपीला वाघोली येथील उबाळेनगर परिसरातून लोणीकंद पोलीस तपास पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.योगेश ऊर्फ नरेंद दिलीप नवगरे (रा. कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस तपास पथक शुक्रवारी गस्तीवर असताना वाघोलीतील उबाळेनगर येथील पंजाबी स्पाईस हॉटेलचे पाठीमागे एक संशयास्पद मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर मोटार कार उभी असल्याची माहिती
    पोलीस अंमलदार अमोल ढोणे यांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला. संशयित कार घेण्यासाठी येताच तपास पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता तीन साथीदारास येरवडा
    पोलीस स्टेशन हद्दीतील चिमा घाट ब्रिजखाली धारदार शस्त्राने धाक दाखवून दरोडा टाकल्याची कबुली दिली. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक १४ सप्टेंबर रोजी इतर तीन साथीदारासह धारदार शस्त्राने गंभीर मारहाण करुन जबरदस्तीने रोख ९० हजार रुपये काढुन घेतल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

    लोणीकंद तपास पथकाने त्याचीअंगझडती घेवून गुन्हयातील रकमेपैकी ५ हजार व त्याचेकडे असलेली कार जप्त केली आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
    सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस
    उपआयुक्त शशीकांत बोराटे, सहा.पोलीस आयुक्त संजय पाटील यांचेमार्गदर्शनाखाली लोणीकंदपोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजितकाइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे)सिमा ढाकणे, तपास पथकाचे सहा.

    पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीसउपनिरीक्षक प्रियांका पवार, पोलीसनाईक स्वप्नील जाधव, पोलीस शिपाईअमोल ढोणे, शुभम चिनके व मल्हारीसपुरे, चंद्रकांत माने यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *