• September 22, 2023
  • No Comment

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने दांपत्याकडून अनेकांची लाखोंची फसवणूक पती- पत्नीविरोधात तक्रार दाखल

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने दांपत्याकडून अनेकांची लाखोंची फसवणूक पती- पत्नीविरोधात तक्रार दाखल

    सध्या सर्व प्रकारचे व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण ऑनलाईन होते. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारांमध्येही वाढ झाली आहे. पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. असेच एक नवीन प्रकरण समोर आले असून म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने दांपत्याकडून अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे

    याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाडाकडून स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने काही लोकांकडून पैसे उकळून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याबाबत रेखा ऊर्फ कलावती भगवान कांबळे आणि तिचा पती भगवान कांबळे (रा. न्यू म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

    रेखा आणि तिच्या पतीने आपण म्हाडामध्ये कार्यरत असून, पुनर्वसनामधील घर स्वस्तात मिळवून देतो म्हणत लोकांना मोबाईलवर म्हाडाची घरे दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी घराच्या बुकिंगसाठी अगोदर १६ हजार रुपये द्यावे लागतील. घर मिळाल्यानंतर म्हाडामध्ये डिमांड ड्राफ्ट काढून पैसे भरावे लागतील. पैसे भरल्याशिवाय घराची चावी मिळत नाही, असे सांगून त्यांना न्यू म्हाडा कॉलनीतील घरे लांबूनच दाखवली रेखा कांबळे हिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी १६ हजार रुपये दिले. त्यानंतर काही महिने उलटून गेले. घराबाबत चौकशी केली असता रेखाने तुम्हाला घर मिळणार नाही. तसेच, स्वत: जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली. तसेच, पतीने गुंडामार्फत मारहाण करण्याची धमकी दिली. या दांपत्याने अशा प्रकारे आतापर्यंत २५ ते ३० नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *