• September 22, 2023
  • No Comment

भावाकडून सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार; 14 वर्षांची बहीण बनली आई

भावाकडून सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार; 14 वर्षांची बहीण बनली आई

    पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून सख्ख्या भावाकडून बहिणीवर आत्याचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. घरात राहणाऱ्या २४ वर्षाच्या भावाने आपल्या लहान असलेल्या १४ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. यातून सदर मुलगी गर्भवती राहिली आणि तिला बाळ झाले आहे. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक माहितीनुसार, ही घटना पुण्यातील वानवडी परिसरामध्ये घडली असून सदर कुटुंब हे मूळचे कर्नाटक येथील आहे. कुटुंबातील महिला धुणे भांड्याची कामे करते तर पती आणि मुलगा वॉचमन म्हणून काम करतात. महिलेची मुलगी शाळेत जाते. आई आणि वडील कामावर गेल्यानंतर आरोपी भाऊ घरी कुणी नसल्याचा फायदा घेत लहान बहिणीवर अत्याचार करत होता

    मागच्या साधारण एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता पण बहिणीने ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. लैंगिक आत्याचारात ती गर्भवती राहिली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आल्यावर ती गर्भवती असल्याचं डॉक्टांनी सांगितलं. काही वेळातच तिला प्रसुतीच्या कळा येऊ लागल्या आणि तिने एका बाळाला जन्म दिला.सदर घटना घडल्यानंतर आईने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलिसांनी २४ वर्षांच्या क्रूर भावावर गुन्हा दाखल केला आहे

    Related post

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

    पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *