• October 14, 2023
  • No Comment

विमाननगर भागात ऑनलाइन वेश्याव्यवसाय… परराज्यातील दोन तरुणी ताब्यात

विमाननगर भागात  ऑनलाइन वेश्याव्यवसाय… परराज्यातील दोन तरुणी ताब्यात

    पुणे : विमाननगर भागात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परराज्यातील दोन तरुणींना ताब्यात घेतले. आरोपी दलाल ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे उघडकीस आले आहे.
    दीपक शरयू यादव (वय २८, रा. चंदननगर, मूळ रा. झारखंड), रवी अशी गुन्हा दाखल केलेल्या दलालांची नावे आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील हवालदार तुषार भिवरकर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक आणि साथीदार रवि ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित होते. समाजमाध्यमात तरुणींचे छायाचित्रे प्रसारित करायचे. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. पैसे दिल्यानंतर तरुणीने विमाननगर भागातील हॉटेलमध्ये बोलावून घेतले जायचे. याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील तुषार भिवरकर आणि अमेय रसाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने विमाननगर भागात छापा टाकून कारवाई केली
    पोलिसांनी हरयाना, तसेच उत्तर प्रदेशातील दोन तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यांची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, सागर केकाण, संदीप कोळगे, बाबा कर्पे, राजेंद्र कुमावत, रेश्मा कंक आदींनी ही कारवाई केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *