• October 14, 2023
  • No Comment

मोबाइल दिला नाही म्हणून दहावीतील 15 वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

मोबाइल दिला नाही म्हणून दहावीतील 15 वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

    पुणे : पुण्यात सध्या आत्महत्येच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यात प्रत्येक्ष क्षेत्रातील आणि प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. मात्र आता थेट दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइल दिला नाही म्हणून दहावीतील 15 वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली आणि यातच या मुलीचा मृत्यू झाला. देहू परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे
    आर्या गणेश सावंत (रा. अभिलाषा हाऊसिंग सोसायटी, देहू) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मोबाईल खेळण्यावरुन घरात आई-वडिलांशी वाद झाला होता. आर्याचे आई वडिल मुळचे सांगोल्याचे आहेत. ते दोघेही साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत. सावंत यांना दोन मुली आहेत. आर्या ही घरातली मोठी मुलगी होती. आर्याने काही कारणासाठी मोबाईल हवा होता मात्र आई वडिलांनी तिला मोबाईल देण्यास नकार दिला. हे पाहून तिचा राग अनावर झाला आणि तिने थेट टोकाचं पाऊल उचललं. ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि थेट सातव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *