• October 14, 2023
  • No Comment

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा

    पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, तसेच दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त आठ दिवस कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

    पंडित बालाजीराव म्हस्के असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना मे ते १९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत मांजरी भागात घडली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडित कुटुंबियांनी मांजरी भागात भाड्याने घर घेतले हाेते. आरोपीने ‘तु मला आवडतेस आणि तू मला हवे ते करू न दिल्यास तुला आणि तुझ्या भावाला जीवे ठार मारेन’ अशी धमकी दिली. घराच्या मागे कपडे धुण्यासाठी गेली असताना तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ॲट्राॅसिटी, बलात्कार, धमकाविणे कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने बलात्कार, धमकाविणे याच्या कलमानुसार शिक्षा सुनावली. तर, अँट्रॉसिटीच्या कलमातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *