• October 13, 2023
  • No Comment

पुणे शांत, सुसंस्कृत शहराचे चित्र आता एक “ड्रग्ज हब” बनू लागल्याने ही चिंतेची बाब 10 महिन्यात कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त

पुणे शांत, सुसंस्कृत शहराचे चित्र आता एक “ड्रग्ज हब” बनू लागल्याने ही चिंतेची बाब   10 महिन्यात कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त

    पुणे : पुण्यात कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरण सध्या सुरू असताना शिक्षणाच्या माहेरघरात गेल्या 10 महिन्यात 14 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शांत, सुसंस्कृत शहराचे चित्र आता एक “ड्रग्ज हब” बनू लागल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे. शिक्षणाच्या माहेरघरात तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे का? , असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे
    10 महिन्यात शिक्षणाच्या माहेर घरात 14 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. “उडता पुणे” मध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्स येतंय कुठून?, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र धडाधड कारवाया करत पुणे पोलीस ड्रग्जचा साठा जप्त करत आहे. कारवाईतून समोर आल्याप्रमाणे नायजेरिया, घाना, राजस्थान, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात गांजा आणि मेफेड्रोनचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं आहे.

    तरुणवर्ग अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन झाल्यामुळे राज्यात अंमली पदार्थाच्या तस्करी आणि विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ड्रग्सचे व्यसन पूर्वी उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित होते. मात्र आता ड्रग्सचा विळखा मोठमोठ्या आयटी कंपन्यांची कार्यालये, महाविद्यालीन विद्यार्थ्यांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत पोहचला आहे. ड्रग्समधून होणारी कमाई कोट्यवधीमध्ये असल्याने अनेक दलाल यामध्ये सक्रिय असतात.

    बंदी असताना बेधडक विक्री सुरु…

    राज्यात अंमली पदार्थ विक्रीवर बंदी आहे. असं असताना राज्यात ड्रग्ससह सर्वच अंमली पदार्थांची बेधकडक विक्री चालू आहे. ड्रग्स, गांजा यासारख्या अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ड्रग्ज तस्कर इंटरनेटचा वापर करतायत. पुण्यातील गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या ललित पाटील पलायन प्रकरणाच्या मुळाशी देखील मेफेड्रोन या अमली पदार्थाची तस्करी हाच विषय आहे. गेल्या 10 महिन्यात पुण्यात 1038 किलो गांजा तर 120 किलो अफिम जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकंदरीत गेल्या 10 महिन्यात पुण्यात तब्बल 14 कोटी रुपयाचे ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.

     

    सर्वाधिक आमली पदार्थ जप्त आकडेवारी

    मेफेड्रोन: 7 कोटी 91 लाख 66 हजार (39 गुन्हे)

    गांजा: 3 कोटी 7 लाख 90 हजार (50 गुन्हे)

    एल एस डी: 1कोटी 12 लाख 64 हजार (2 गुन्हे)

    चरस: 48 लाख 2 हजार (4 गुन्हे)

    अफिम: 47 लाख 82 हजार (9 गुन्हे)

    हेरॉईन: 46 लाख 89 हजार (1 गुन्हे)

    पोलिसांसमोर मोठं आव्हान

    गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात ड्रग्स अतिशय सहजपणे उपलब्ध होत आहेत, ज्यामधे गांजा असेल किंवा पार्टी ड्रग्स म्हणून ओळखले जाणारे एल एस डी किंवा एम डी याचा सर्वाधिक वापर होताना दिसतोय. हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे

    Related post

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

    पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *