- October 14, 2023
- No Comment
आयुर्वेद स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय आरोपीला अटक

पुणे : पुणे शहरात अनेक ठिकाणी स्पा सेंटर सुरु झाले आहे. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेगळाच प्रकार सुरु असतो. पुणे येथील पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा प्रकार समोर आणला आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राया आयुर्वेद स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचून पोलिसांनी सचिन रतन केदारी याला अटक केली. तसेच त्या ठिकाणावरुन दोन मुलींची सुटका केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरांत आर्थिक फायद्यासाठी तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडला जात असल्याचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे




