• October 15, 2023
  • No Comment

कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी; पुणे रेल्वे स्थानकावरुन 90 किलो गांजा जप्त

कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी; पुणे रेल्वे स्थानकावरुन 90 किलो गांजा जप्त

    पुणे : पुण्यात एकीकडे ससून ड्रग्ज प्रकरण सुरु असतानाच कस्टम विभागाने पुणे रेल्वे स्टेशनवर मोठी कारवाई केली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरुन 90 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत सुमारे 27 लाख रुपये आहे. कोणार्क एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याच एक्सप्रेसमधून हा गांजा जप्त करण्यात आला आहे
    ओडीसावरून पुण्याकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी सुरु असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुणे कस्टम विभागाकडून दोन आरोपींनादेखील अटक करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी सुरु असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यांनी पुणे स्टेशनवर सापळा रचला होता. त्यानुसार कोणार्क एक्सप्रेस पुण्यात दाखल होताच कस्टम विभागाने धडाधड कारवाईला सुरुवात केली. यात तब्बल 27 लाख रुपयांचा गांजा जप्त केला

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *