- October 15, 2023
- No Comment
वारजे माळवाडी परिसरात किराणा दुकानात गेलेल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : किराणा दुकानात टोमॅटो आणण्यासाठी गेलेल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादयक घटना वारजे माळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. तर गणेशखिंड रोड परिसरात एका 11 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वारजे माळवाडी येथील घटनेत फिर्यादी यांची 15 वर्षाची मुलगी बिल्डींगच्या खाली असलेल्या किराणा दुकानात टोमॅटो आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी फिर्यादी यांच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सुनील दोडमणे या आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला मारहाण करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मागिल दिवसांमध्ये तसेच 13 ऑक्टोबर रोजी घडला आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन वारजे पोलीस ठाण्यात आरोपीवर पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.




