- October 16, 2023
- No Comment
तरुणीला मारहाण चार जणांवर गुन्हा दाखल

पुणे : रिक्षातून उतरुन घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी एका 21 वर्षाच्या तरुणाली कट मारून खाली पाडले. त्यानंतर तरुणीला मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याची घटना गणेशखिंड रोड, औंध येथे शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 21 वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश रणजीत पाटोळे व त्याचे इतर अनोळखी तीन साथीदार (सर्व रा. गणेशखिंड रोड, औंध, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात.
शुक्रवारी रात्री फिर्यादी या त्यांच्या वडिलांच्या रिक्षातून उतरून घरी एकट्या चालत जात होत्या.
त्यावेळी पाठीमागून आरोपी दुचाकीवरून आले. ऋषिकेश पाटोळे याने फिर्यादी यांना धक्का मारला.
यामुळे तरुणी खाली पडली. त्याचा जाब विचारला असता आरोपीने मारहाण करुन विनयभंग केला.
त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला आसता पाटोळे याने फिर्य़ादी यांच्या आई-वडिलांना धक्काबुक्की करुन पळून गेला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करीत आहेत.




