• October 26, 2023
  • No Comment

पिंपरी आणि थेरगाव या दोन ठिकाणी कारवाईमध्ये ३८५ लिटर हातभट्टी दारू तसेच वाहतूकीसाठी वापरणारी कार असा दोन लाख ३० हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी आणि थेरगाव या दोन ठिकाणी कारवाईमध्ये ३८५ लिटर हातभट्टी दारू तसेच वाहतूकीसाठी वापरणारी कार असा दोन लाख ३० हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त

    पिंपरी : चारचाकी वाहनातून गावठी दारुचे वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पनादन शुल्क विभागाकडून रविवारी कारवाई करण्यात आली. पिंपरी आणि थेरगाव या दोन ठिकाणी कारवाईमध्ये ३८५ लिटर हातभट्टी दारू तसेच वाहतूकीसाठी वापरणारी कार असा दोन लाख ३० हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून गावठी दारुuntilची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोन कारवर कारवाई केली. या कारवाईमध्ये २० हजार रुपये किंमतीची ३८५ लिटर गावठी दारु तसेच दोन लाख १० हजार रुपये किंमतीची कार पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक नारायण मुंजाळ, प्रकाश सेतसंधी,सहाय्यक दुय्यम निरीक्षक, स्वप्नील दरेकर तसेच महेंद्र कदम, जी. के.सोळंके, एन यु जाधव यांच्या पथकाने केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *