• October 26, 2023
  • No Comment

हिंजवडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला नागपुरातील अंबाझरी तलावात

हिंजवडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला नागपुरातील अंबाझरी तलावात

    पिंपरी :हिंजवडी येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या पाण्यात शनिवारी (दि.२१) मिळून आला. ही आत्महत्या आहे की काही घातपात याचा तपास पोलिस करत आहेत. सुरजकुमार विलास बांबल (वय ३२, रा.शिवगणेश नगर, पुणे) असे मृताचे नाव आहे. सुरजकुमार बेपत्ता असल्याविषयी हिंजवडीपोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.१९) विलास रंगरावजी बांबल (६३, रा. शिवगणेश नगर धावडे वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली होती.
    मिळालेल्या माहितीनुसार, सुरजकुमार हा हिंजवडीमधील आयटी कंपनीत काम करत होता. तो गुरुवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी निघाला होता. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. घरच्यांनी त्याचा शोध घेत हिंजवडी पोलिस ठाण्यात तो हरवला असल्याबाबतची फिर्याद दिली. पोलिस त्याचा शोध घेत असतानाच शनिवारी (दि.२१) सकाळी सातच्या सुमारास नागपूर पोलिसांना सुरजकुमार याचा मृतदेह अंबाझरी तलावात सापडला. सुरजकुमारच्या खिशातील कागदपत्रावरून त्याचे नाव पोलिसांना समजले. सुरजकुमार हा पुण्याहून नागपूरला कसा आला? त्याने आत्महत्या केली की घातपात झाला याविषयी पोलिस अधिक तपास करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *