- November 8, 2023
- No Comment
चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणारा एकजण जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट 06 ची कारवाई
वाघोली: गुन्हे शाखा यूनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे यूनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना *पो.अंम 8159 ऋषीकेश ताकवणे* यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खडकी पोलीस स्टेशन गु र नंबर 401/2023 भा दं वि क 392,34 (जबरी चोरी) प्रमाणे अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद असून सदरचा गुन्हा हा पुणे शहर रेकॉर्डवरील आरोपी नामे योगेश सोनवणे याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी सदर माहिती तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना कळविले असता त्यांनी मिळाले बातमीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय व त्यांचे टीमने त्या अनुषंगाने त्याचा शोध घेत असताना तो गोल्डन बेकरीसमोर, वडगाव बुद्रुक, पुणे येथे थांबला असल्याची माहिती मिळाल्याने स्टाफ सह जाऊन त्यास दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याला नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव *योगेश जगदीश सोनवणे वय २३ रा. घर नंबर ७३४, अडीकँप चौक, नानपेठ, पुणे* असे सांगितले. त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा सुझुकी अक्सेस दुचाकीवरून त्याचा साथीदार *राहुल कांबळे* याचेसह केल्याची कबुली दिली असून सदर दुचाकी वाहनाबाबत माहिती घेता सदरबाबत *कोथरुड पो स्टेशन गु र नं 233/2023 भा दं वि क 379 प्रमाणे* गुन्हा दाखल असले बाबत माहिती मिळाली असून ती गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आली आहे *सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर पुणे शहर, पुणे ग्रामीण या भागात चैन स्नॅचिंग, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत* . सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपास कामी खडकी पोलीस ठाणे यांचे स्वाधीन केले आहे. तर राहुल कांबळे यास खडकी पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतला आहे.
सदर आरोपी कडून खालीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहेत-
1) *खडकी पोलीस स्टेशन गु र नंबर 401/2023 भा दं वि क 392,34 प्रमाणे*
2) *कोथरुड पो स्टेशन गु र नं 233/2023 भा दं वि क 379 प्रमाणे*
सदरची कामगिरी मा. श्री रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री मा. सतीश गोवेकर सहा. पोलीस आयुक्त सो गुन्हे २ या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पो हवा रमेश मेमाने, पो अं ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे या पथकाने केलेली आहे.