पुण्यात बीटी कवडे रोडवर सराफी व्यावसायिकावर गोळीबार, परीसरात प्रचंड खळबळ

    पुण्यात बीटी कवडे रोडवर सराफी व्यावसायिकावर गोळीबार, परीसरात प्रचंड खळबळ

    पुणे : वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीटी कवडे रोडवर सराफी व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना काही
    मिनीटांपुर्वी झाली आली . याबाबतची खबर पोलिसांनी
    मिळाली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
    याबाबत थोडक्यात माहिती अशी की, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीटी कवडे रोडवरून जाणाऱ्या दुचाकीस्वारावर गोळीबार झाला आहे. त्याच्या पायावर गोळया झाडण्यात आल्या आहेत. नेमक्या किती गोळया झाडण्यात आल्या याबाबत माहिती समोर आलेली नाही मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्यासह वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.वानवडीतील बीटी कवडे रोडवर गोळीबार झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रतिक मदनलाल ओसवाल (35) यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ओसवाल हे सराफी व्यावसायिक असून हल्लेखोर हे लोखोंचे सोन्या-चांदीचे दागिने घेवून पसार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.प्रतिक मदनलाल ओसवाल (35) यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *