• February 1, 2024
  • No Comment

दोन मित्रांकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार पुण्यातील मांजरी परिसरातील घटना

दोन मित्रांकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार पुण्यातील मांजरी परिसरातील घटना

    पुणे : पुण्यात सध्या बलात्काराचं प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यातच एक संतापजनक घटना समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून 15 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.

    याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित मुलीचे मित्र होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग व गणेश यांनी मुलीला फिरायला नेतो असे सांगून फिर्यादी यांच्या सोबत गाडीवर बसून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेलं. तिथे असलेल्या एकांताचा फायदा घेऊन अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे यांनी मुलीवर आळीपाळीने जबरदस्तीचे शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर मुलीला त्या निर्जनस्थळी सोडून निघून गेले. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

    हा सगळा प्रकार घडल्यानंतर मुलीला अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे या दोघांनी मिळून धमकी दिली. या संदर्भात कोणाला सांगितलं तर मारुन टाकेन म्हणत मुलीला धमकावल्याचंदेखील तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे हे दोघेही या मुलीचे मित्र होते. या दोघांवर विश्वास ठेवून मुलीने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र मित्रांनीच घात केला

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *