- February 14, 2024
- No Comment
मुलानेच आईवर केला चाकू हल्ला
पुण्यातील थेरगाव परिसरात घडली आहे. आईने आपल्या मुलाला घरातील दागिने कोठे ठेवले, गहाण ठेवले की विकले असे आईने विचारले असता मुलाने थेट चाकूने आईवरच जीवघेणे वार केले आहेत. याप्रकरणी आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मुलगा ओंकार ईश्वर बामणे (वय 19 रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, मुलाला आईने दागिन्याबाबत विचारणा केली. दागिने विकले की गहाण ठेवले, असं आईने मुलाला विचारलं त्यानंतर यासंदर्भात माहिती दे नाहीतर पोलिसांना बोलवेल, अशी आईने मुलाला धमकी दिली. या धमकीचा मुलाला राग आला आणि रागाचाभारात चाकूने जन्मदात्या आईच्या डोक्यावर आणि हातावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला