• February 14, 2024
  • No Comment

शिवीगाळ का केला? विचारल्याने चाकू हल्ला

शिवीगाळ का केला? विचारल्याने चाकू हल्ला

    शिवीगाळ का केली? याचा जाब विचारल्यामुळे एकाने थेट बापलेकांवर चाकूने हल्ला केला आहे. टेल्को कॉलनीत हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संग्राम धुळूबा शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी संग्रामला अटक केली आहे. गौरव कुलथे आणि त्याचे वडिल नवनाथ कुलथे या घटनेत चांगलेच जखमी झाले आहेत. अधिक माहितीनुसार तिघेही एकाच परिसरात राहायला आहे आणि एकमेकांना ओळखतात. आरोपी असलेल्या संग्रामने दोन महिन्यांपूर्वी परिसरात दारु पिऊन गोंधळ घातला होता. त्यावेळी नवनाथ कुलथे यांनी आरोपीला समजावून घरी पाठवलं होतं. याचा राग मनात ठेवून तुला आता संपवूनच टाकतो म्हणत वडिल आणि मुलावर हल्ला केला. त्याच्या पोटात सपासप चाकूचे वार केले आणि त्यांना गंभीर जखमी केलं. मुलगा वडिलांना वाचवण्यासाठी गेला असता त्याच्याही पोटात चाकू खुपसला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *