• February 14, 2024
  • No Comment

पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सात गावात छापे; लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सात गावात छापे; लाखांचा मुद्देमाल जप्त

    पुणे : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारुविरोधात मोहीम राबवली असून त्यांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत 995 लीटर गावठी हातभट्टी दारूसह 7 लाख 90 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

     

    भरारी पथकाने गेल्या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आणि आंबळे या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 5 वारस आणि 3 बेवारस अशा 8 गुन्ह्यांची नोंद करून 995 लिटर गावठी हातभट्टी दारू, 25 हजार लिटर रसायण, 3 दुचाकी वाहने आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे. यापुढेदेखील पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्क उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या मोहिमा आखून अवैध दारू व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *