• February 14, 2024
  • No Comment

पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार; गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली! बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार

पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार; गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली!   बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची  झाडाझडती घेणार

    मागील महिन्याभरात राज्यभरात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या. त्यासोबतच पुण्यातदेखील औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अशाच काही घटना राज्यातदेखील घडल्या त्यामुळे आता पिस्तूल धारकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणाकडे बेकायदा पिस्तूल आहे? किती गुन्हे दाखल आहे? कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहे? पिस्तुलचा वापर नेमका कोणत्या शहरात आणि कशासाठी केला आहे? या सगळ्याची माहिती घेतली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे हे गुन्हेगार आता नेमकं काय करतात? याचीदेखील माहिती घेतली जाणार आहे.

    सराईत गुन्हेगाराची आणि गुन्ह्यांची यादी तयार पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्याच काही दिवसांच ही गुन्हेगारी रोखण्यासाठी चंग बांधला आहे. त्यातच पुण्यातील कुख्यात गुंड आणि गुन्हेगारांना बोलवून त्यांची परेड काढली. त्यानंतर ड्रग्स तस्करांना बोलवून त्यांना सज्जड दम दिला. कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा विचार केला तर याद राखा, अशा शब्दांत त्यांना दम दिला. त्यानंतर सोशल मीडियावरुन गुन्हेगारी पसरवायची नाही, रिल्स पोस्ट करायचे नाही, अशा कडक शब्दांत सूचना दिल्या. त्यानंतर आता पिस्तूल धारकांवर पुणे पोलिसांनी नजर असणार आहे. या सगळ्या गुन्हेगाराची यादी तयार केली आहे. त्यांना बोलवून दम दिला जण्याची शक्यता आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *