- February 23, 2024
- No Comment
दिघी परिसरातील लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
पिंपरी : दिघी येथील वडमुखवाडी परिसरातील लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन लॉज मालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.20) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वडमुखवाडी परिसरातील खडीमशीन रोडवरील सनशाईन लॉज येथे केली आहे.
नितीन रावसाहेब कोकरे (वय-28 रा. विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 370 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे (वय-38) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वडमुखवाडी येथील सनशाईन लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्याच्या लॉजमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस फौजदार पारधी करीत आहेत