• February 23, 2024
  • No Comment

जुन्या वादाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार

जुन्या वादाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार

    पिंपरी : जुन्या वादाच्या कारणावरुन चार जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. यावेळी जीव वाचवण्यासाठी पळालेल्या तरुणाचा पाठलाग करुन आज तुला सोडत नसतो अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील श्रीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

    याबाबत आकाश सोमनाथ गोडेपाटील (वय-27 रा. श्रीनगर, रहाटणी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून आदित्य अहिरराव (रा. तापकीरनगर, काळेवाडी), प्रेम तरडे, प्रतिक माने (रा. श्रीनगर, थेरगाव) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या साथीदारावर आयपीसी 308, 323, 506, 34 सह आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश आणि आदित्य यांच्यात पूर्वी बाचाबाची झाली होती.
    याचा राग आरोपीच्या मनात होता. मंगळवारी रात्री आरोपींनी संगनमत करुन आकाश याला रहाटणी येथील ग्रेट
    पंजाब हॉटेलजवळ गाठले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
    आरोपी प्रतिक माने याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने वार केला.त्यानंतर इतरांनी कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
    त्यावेळी फिर्यादी यांनी कोयत्याचा वार चुकवून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळून गेले. नंतर चार जणांनी आकाश याचा पाठलाग केला. आज तुला सोडत नसतो, अशी धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस गायकवाड करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *