• February 23, 2024
  • No Comment

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

    पिंपरी : गावठी दारुची टेम्पोमधून होणाऱ्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश करत राज्य उत्पादन शुल्क एक्साइज विभागाच्या पथकाने दारुची हातभट्टी उद्ध्वस्त केली. यात टेम्पोसह सहा लाख ४१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    अर्जुन बिरबल राठोड (३७,रा. ईनाम वस्ती, शेल पिंपळगाव, ता. खेड) याला याप्रकरणी अटक करण्यात आली. एक्साइजच्या तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक संजय सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्साइजचे पथक रात्र गस्तीवर असताना माहिती मिळाली की, गावठी दारुची टेम्पोमधून वाहतूक होणार आहे. त्यानुसार गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, चाकण-शिक्रापूर रस्त्यावर बोसे गावाच्या हद्दीत एक्साइजच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी एक संशयित पिकअप टेम्पो दिसला. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अर्जून राठोड हा अवैध गावठी दारूची वाहतूक करत असल्याचे समोर आले. त्याच्या टेम्पोमध्ये गावठी दारुचे १९ हजार ८०० रुपये किमतीचे प्लास्टिक कॅन मिळून आले. गावठी हातभट्टी दारू कोठून आणली, अशी राठोड याच्याकडे चौकशी केली. मी स्वत: गावठी हातभट्टी दारूची निर्मिती करतो, असे त्याने पथकाला सांगितले. त्याला घेऊन गावठी हातभट्टी निर्मिती ठिकाणाची तपासणी केली असता तेथे गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे एक हजार लिटर क्षमतेचा एक लोखंडी बॅरल, रसायनाने भरलेले ५०० लिटर क्षमतेचा एक लोखंडी बॅरल रिकामा तसेच इतर साहित्य मिळून आले. या कारवाईत वाहनासह एकूण सहा लाख ४१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *