• March 4, 2024
  • No Comment

पुणे शहर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना मंगळवारपासून पुणे शहरात येण्यास बंदी

पुणे शहर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना मंगळवारपासून  पुणे शहरात येण्यास बंदी

    पुणे : शहर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना मंगळवारपासून (५ मार्च) पुणे शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुण्याबाहेरून मुंबई, सोलापूर, अहमदनगर, साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले.शहरात मेट्रो मार्गिकेसह विविध विकास कामे सुरू आहेत. विविध कामांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुणे शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून केली जाणार आहे


    पिंपरी-चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांसाठी ही बंदी लागू राहील. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी शहरात जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी चिंचवड शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. नगर रस्त्यावरील वाघोलीतून पुण्याकडे येणाऱ्या जड वाहनांना २४ तास प्रवेश बंद राहणार आहे. जड वाहनांनी शिक्रापूरहून चाकणमार्गे पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव दाभाडेमार्गे मुंबईकडे जावे. नगरकडे जाणाऱ्या जड वाहनांनी थेऊर फाटा येथून लोणीकंद आणि शिक्रापूरमार्गे इच्छितस्थळी जावे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *