• March 4, 2024
  • No Comment

पिंपरी-चिंचवडमधून अपहरण केलेल्या व्यक्तीची पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून सुखरूप सुटका

पिंपरी-चिंचवडमधून अपहरण केलेल्या व्यक्तीची पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून सुखरूप सुटका

    पिंपरी-चिंचवडमधून अपहरण केलेल्या व्यक्तीची पिंपरी- चिंचवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. शेळ्यां- मेंढ्या विक्रीत मध्यस्थी करून ती व्यक्ती पैसे कमवायची. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात राहत असणाऱ्या ज्ञानेश्वर यादव रुपनर आणि त्याच्या इतर साथीदाराने तुकाराम शिंपले यांचे चिंचवडमधून अपहरण केलं होतं. अखेर त्यांची सुटका करण्यात पोलिसांना यश आल आहे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या तुकाराम शिंपले या व्यक्तीचं चिंचवडमधून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं होतं. याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली होती. तुकाराम शिंपले हे शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात मध्यस्ती करून पैसे कमवायचे. मध्यस्थी करत असताना समोरच्या व्यक्तीने अनेक व्यवहारात पैसे न दिल्याने अनेकांचे देणेकरी ठरलेले तुकाराम शिंपले यांनी घर, दागिने आणि जमीन विकून काही जणांचे पैसे दिले. तर काहींचे पैसे देणे राहिले असल्याने ते काही महिन्यांपासून चिंचवडमध्ये पत्नीसह राहण्यास आले होते. दरम्यान, मेंढपाळ रघुनाथ नरुटे यांच्या शेळ्या-मेंढ्या विक्री व्यवहारांमध्ये तुकाराम शिंपले याने साडेचौदा लाख रुपये न दिल्याने तसेच त्याच्याकडे वारंवार पैसे मागूनही न दिल्याने रघुनाथ नरुटे याने त्याचा भाचा ज्ञानेश्वर यादव रुपनर, मित्र संदीप विक्रम नखाते, हंसराज सोळंके, नितीन जाधव यांनी चारचाकी गाडीतून तुकाराम शिंपले यांचं अपहरण केलं होतं. अखेर त्यांची बीड जिल्ह्यातील धारूर येथील काळ्याची वाडीतून सुखरूप सुटका करण्यात आली. तुकाराम शिंपले यांना एका बंद खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनने केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *