• March 4, 2024
  • No Comment

मोबाइल चोरणाऱ्या गुजरातमधील चोरट्यांना चंदननगर पोलिसांकडून अटक

मोबाइल चोरणाऱ्या गुजरातमधील चोरट्यांना चंदननगर पोलिसांकडून अटक

    पुणे : मोबाइल चोरणाऱ्या गुजरातमधील चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून आठ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. किरण अमरसिंग नटमारवाडी (वय १९), मांगी अमरसिंग नटमारवाडी (वय ४७, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. जवाहरनगर, नडीयाद, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    किरण आणि त्याची मांगी यांनी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडील मोबाइल चोरून नेले होते. चंदननगर भाजी मंडई परिसरात एक महिला आणि साथीदार चोरलेले मोबाइल विक्री करत असल्याची माहिती विकास कदम, नामदेव गडदरे यांना मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा मोबाइल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून आठ मोबाइल जप्त करण्यात आले.
    ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील , उपनिरीक्षक तानाजी शेगर , अविनाश संकपाळ, विकास कदम, नामदेव गडदरे, श्रीकांत शेंडे, शेखर शिंदे यांनी केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *