• March 4, 2024
  • No Comment

तडीपार कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला मुंढवा पोलिसांकडून अटक

तडीपार कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला मुंढवा पोलिसांकडून अटक

    पुणे : तडीपार कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

    तेजस कृपेंद्र पायगुडे (वय २७, रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पायगुडेविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल आहेत. त्याला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर पायगुडे मुंढवा भागातील लोणकर पेट्रोल पंपाजवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली


    पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक निरीक्षक आण्णासाहेब टापरे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे आणि पथकाने ही कारवाई केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *