• March 4, 2024
  • No Comment

पुरंदरमध्ये अफूची शेती दोनजणांना अटक त्यांच्याकडून पाऊण लाख रुपये किमतीची ३८ किलो अफूची बोंडे जप्त

पुरंदरमध्ये अफूची शेती दोनजणांना अटक त्यांच्याकडून पाऊण लाख रुपये किमतीची ३८ किलो अफूची बोंडे जप्त

    पुणे : पुरंदर तालुक्यातील कोडित गावात पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या अफूच्या शेतीनंतर पुन्हा मावाडी गावातील शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोनजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून पाऊण लाख रुपये किमतीची ३८ किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली.

    अफूची विनापरवाना शेती केल्याप्रकरणी किरण कुंडलिक जगताप (वय ४०) आणि रोहिदास चांगदेव जगताप (वय ५५, दोघे रा. कोडित बुद्रुक, ता. पुरंदर, जि. पुणे ) यांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेजुरी आणि भोर पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. कोडित गावात पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकून अफूची शेती उघडकीस आणली. याप्रकरणी दोन ज्येष्ठ नागरिकांना अटक करण्यात आली होती

    त्यानंतर मावडी गावात शेतात अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संपूर्ण शेताची पाहणी केली. त्यात कांदा आणि लसणाच्या पिकांमध्ये अफूची झाडे लावण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी जगताप यांना अटक करण्यात आली असून, जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *