• March 4, 2024
  • No Comment

राजगुरुनगरमध्ये सातबाराच्या नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी सर्कल जाळ्यात, ACB ची कारवाई

राजगुरुनगरमध्ये सातबाराच्या नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी सर्कल जाळ्यात, ACB ची कारवाई

    राजगुरूनगर : सातबारावरील नोंद घालण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतल्यावरून राजगुरुनगरच्या सर्कल आणि तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याच घटना समोर आली आहे.

    सोमवारी दुपारी तीन वाजता राजगुरुनगर तलाठी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई झाली. मंडल अधिकारी सविता घुमटकर आणि तलाठी बबन लंघे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेली सातबारा उताऱ्यावरिल नोंद पुन्हा घालण्यासाठी सर्कल आणि तक्रारदार यांच्यात १५ हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले होते. त्यातील इसार रक्कम म्हणुन दोन हजार रुपये तलाठ्याकडे दिल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले असल्याचे सांगण्यात आले.


    दरम्यान, खेड तालुक्यातील महसुल विभागातील सर्वच कार्यालयात काम करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत

    Related post

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…
    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *