• March 2, 2024
  • No Comment

यशवंतची एक इंच ही जमीन न विकता कारखाना सुरू करणार माधव अण्णा काळभोर. शेतकरी विकास आघाडी नसून व्यापारी आघाडी असल्याचा सुदर्शन चौधरी यांचा विरोधकांना टोला

यशवंतची एक इंच ही जमीन न विकता कारखाना सुरू करणार माधव अण्णा काळभोर. शेतकरी विकास आघाडी नसून व्यापारी आघाडी असल्याचा सुदर्शन चौधरी यांचा विरोधकांना टोला

यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी विरोधक धादांत खोटे आरोप करत असुन खोटे बोल पण रेटून बोलून सभासदांची फसवणूक करीत आहेत. कारखाना प्रशासकाच्या ताब्यात गेल्यावर बंद पडला परंतु, सभासद सुज्ञ आहेत. विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपाला बळी पडणार नाही. अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल हे शेतकरी सभासदांच्या हितासाठी उभे करण्यात आल्याने कारखान्यावर एकहाती वर्चस्व येणार असून संपुर्ण पॅनेल विजयी होणार.असल्यामुळे विरोधक बिनबूडाचे आरोप करत आहे. कारखान्याची एक इंचही मालमत्ता न विकता कारखाना चालू करून दाखवितो, बिनविरोध करण्यासाठी अनेक मिटिंग झाल्या परंतु त्यात यश आले नाही एकीकडे विरोधी पॅनेलचे प्रमुख बिनविरोध साठी बसायचे आणि आणि दुसरीकडे पॅनलला चिन्ह मागणीचा अर्ज मात्र आधीच करुन ठेवायचं खरंतर त्यांच्या मनातच नव्हतं बिनविरोध निवडणूक करायची असे प्रतिपादन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव अण्णा काळभोर यांनी केले. थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (ता. २९) सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माधव काळभोर बोलत होते. यावेळी के. डी. कांचन, दिलीप काळभोर, सुरेश घुले, माजी संचालक महादेव काकडे, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, रवींद्र कंद, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, राजाराम कांचन, महादेव कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, सनी काळभोर, लोचन शिवले, माजी सरपंच माधुरी काळभोर, ललिता काळभोर, अलका कुंजीर, नागेश काळभोर, अमित काळभोर, कमलेश काळभोर, बाजीराव भालसिंग, राजेंद्र खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुरेश घुले म्हणाले की, कारखान्यावर पूर्वी जे संचालक झालेले पदाधिकारी आहेत, ते आणि त्यांच्या कुटुंबातील कोणी नको, अशी चर्चा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झाली होती.कारखाना सुरू करण्यासाठी सरकारची मदत लागणार आहे सध्या तीन पक्षाचे सरकार राज्यात आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे सर्वोतोपरी मदत करायला तयार आहेत.ज्यावेळेस कारखाना बिनविरोध करायचा होता,तेव्हा जुन्यापैकी कोणी नाही, अशी आपली भूमिका होती. मात्र, एक-दोन जुनी माणसं त्यामध्ये आली म्हणून त्याच्यातून काही फरक पडणार नाही. माजी संचालक महादेव कांचन म्हणाले की, कारखान्यावर १५ वर्षे याठिकाणी संचालक म्हणून काम केले आहे. या वास्तूला माझे दैवत मानतो. या काळात एक रुपयाचा भत्ता सुद्धा घेतला नाही विरोधकांनी खोटे आरोप करतात त्यांची सर्व अंडीपिल्ली माहिती आहे. त्यामुळे जास्त उड्या मारू नका. कारण या निवडणुकीत १ हजार मतांच्या फरकाने शंभर टक्के आम्ही निवडून येणार आहोत.बाजार समितीचे दिलीप काळभोर म्हणाले की, यशवंत सहकारी साखर कारखाना तेरा वर्षांपूर्वी बंद पडला होता. हा कारखाना तेव्हा प्रशासकाच्या ताब्यात होता. तेव्हा कारखाना बंद पडला आहे. कारखान्यावर कर्ज असल्याने कारखाना बँकेच्या ताब्यात आहे. पहिले बँकेचे कर्ज भरल्यानंतरच कारखाना सुरु होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेऊन कारखाना चालू करणार आहे. त्यामुळे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या सर्व सभासदांनी आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलला गंभीर साथ देऊन सर्व उमेदवारांना निवडून द्या. बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी म्हणाले की आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार हे एक नंबर आहेत उच्चशिक्षित आहेत विशेष सांगायचे म्हणजे यावेळी सहा नंबर गटात इतिहास घडणार आहे. विरोधकांचा पॅनेल हा शेतकरी विकास आघाडी नाही, तर व्यापारी विकास आघाडी आहे. त्यामुळे जनतेने रयत सहकार पॅनेलला मतदान करून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे.

(महाराष्ट्र क्राईम वॉच पत्रकार दिगंबर जोगदंड लोणी काळभोर)

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *