- February 29, 2024
- No Comment
बार- रूफटॉप-पब’ रात्री दीडलाच बंद पोलीस आयुक्तांकडून सुचना
पुणे : ‘बार-रूफटॉप-पब’ रात्री दीड म्हणजे दीडलाच बंद करावे लागणार आहे. ग्राहकांना बाहेर पाडण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला असून वेळेत या आस्थापना बंद करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉटेल-पब चालकांना केल्या आहेत. यासोबतच रेस्टॉरंटला विनाकारण त्रास देण्यात येऊ नये असे आदेश देखील त्यांनी पोलिसांना दिले आहेत. ‘पब-बार-रूफटॉप’, रेस्टॉरंट चालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. बुधवारी आस्थापना चालक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तालयात या आस्थापना चालकांची बैठक घेण्यात आली.यामध्ये नियमावली बाबत हरकती व सूचनांसह त्यांच्या अडीअडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने आयुक्तांनी नियमावलीत काही बदल करण्याचा देखील निर्णयघेतला आहे. ‘पब-बार- रूफटॉप’ करिता रात्री दीडपर्यंतची मुदत आहे.