- December 6, 2024
- No Comment
वाघोली: घरफोडी करणार्या अट्टल गुन्हेगारास अटक
लोणीकाळभोर येथील घरफोडी, मोबाईल चोरी गुन्हयातील सराईत
रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद त्याच्याकडून दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले गुलाम रजा ऊर्फ मसाट मजलुम सय्यद इराणी, (वय २६ वर्षे, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलीस त्याचा शोध घेत असताना बातमी मिळाली की,घरफोडी, मोबाईल चोरी गुन्हयातील सराईत रेकॉर्डवरील आरोपीगुलाम रजा ऊर्फ मसाट मजलुम सय्यद इराणी,पठारे वस्ती, लोणीकाळभोर येथे राहतात येथे आला आहे ही माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने तिकडे रवाना झाले. त्यांनी आरोपीला पकडले.
त्याचेकडुन तपास केला असता त्याचा खालील गुन्हयांमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे.
१) वाघोली पो.स्टे. गु.र.नं. ११४१ / २०२४, भा. न्या. सं. कलम ३०३ (२) २) वाघोली पो.स्टे. गु.र.नं. ११४२ / २०२४, भा. न्या. सं. कलम ३३१ ( ४ ), ३०५ (अ) आरोपीताकडुन घरझडती पंचनाम्या अंतर्गत दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी जप्त मोबाईलसह वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो.हवा. रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, पो.ना. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो. अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे