• December 7, 2024
  • No Comment

स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

    पुणे : स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली.

    ज्योती कैलास बर्डे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. कैलास बर्डे शहर पोलीस दलात नियुक्तीस आहेत. बर्डे दाम्पत्य स्वारगेट पोलीस वसाहतीत राहायला आहेत. शुक्रवारी दुपारी ज्योती आणि त्यांचा भाऊ घरी होता. ज्योती यांनी दुपारी अडीचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती यांच्या भावाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.
    पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा ज्योती यांनी आात्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली नसल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *