• December 10, 2024
  • No Comment

पुणे शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेशाचा भंग करुन आलेल्या गुंडाला येरवडा पोलिसांनी पकडले

पुणे शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेशाचा भंग करुन आलेल्या गुंडाला येरवडा पोलिसांनी पकडले

    पुणे : शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला येरवडा पोलिसांनी पकडले. येरवडा भागात ही कारवाई करण्यात आली. फिराेज नासीर खान (वय २०, रा. शेलार चाळ, गाडीतळ, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. खान याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला २६ जून रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करुन तो येरवडा भागात आल्याची माहिती येरवडा पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. त्याला शेलार चाळ परिसरातील मोकळ्या जागेत सापळा लावून पोलिसांनी पकडले. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *