• December 10, 2024
  • No Comment

कर्वेनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने किरकोळ वादातून एका तरुणावर हल्ला याप्रकरणी तिघांना अटक

कर्वेनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने किरकोळ वादातून एका तरुणावर हल्ला याप्रकरणी  तिघांना अटक

    पुणे : कर्वेनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने किरकोळ वादातून एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली.

    ओंकार विजय स्वामी (वय २७, रा. गगनगिरी कॉलनी, कोथरुड) असे जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी हेमंत ऊर्फ लोकेश सुरेश माथवड (वय २९, रा. कोथरूड ), शुभम रामभाऊ मोकाटे (वय २९, रा. आझादनगर, कोथरुड), नचिकेत ऊर्फ अजिंक्य गंगाधर ओव्हाळ (वय २६, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरुड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रकाश चव्हाण यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने तिघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कर्वेनगर भागातील एका रेस्टोरंट बारमध्ये दारु प्यायले गेले. शनिवारी मध्यरात्री ते बारसमोर थांबले होते. त्यावेळी त्यांची किरकोळ वादातून स्वामी याच्याशी भांडणे झाले. आरोपी मोकाटेने त्याच्या पाठीत फरशी घातली. माथवडने त्याला कुंडी फेकून मारली. त्यानंतर स्वामी तेथून पळाला.आरोपींनी त्याला कर्वे रस्त्यावरील एका हाॅटेलजवळ पाठलाग करुन पकडले. त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत स्वामी बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *