• December 10, 2024
  • No Comment

पुण्यात एका महिला कॉन्स्टेबलला भरधाव कारची धडक आरोपी फरार

पुण्यात एका महिला कॉन्स्टेबलला भरधाव कारची धडक आरोपी फरार

    पुण्यातून अपघताची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला नाकाबंदी दरम्यान उडवल्याची घटना घडली आहे. यात भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने नाकाबंदीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली आहे. पुणे स्टेशन परिसरात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय. या अपघतानंतर अज्ञात चार चाकी वाहनचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयित आरोपीचा ही शोध घेत आहे. मात्र हा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात रात्री गस्तीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलिस जखमी झाली आहे. दीपमाला नायर असं जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पोलिस सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपीचा तपास करत आहेत. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस वाहन चालकाचा तपास करत असल्याची माहिती झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *