• December 11, 2024
  • No Comment

बॅरिकेटला धडक देऊन महिला पोलिसास फरफटत नेणाऱ्या कारचालकाला पकडण्यात पोलिसांना यश

बॅरिकेटला धडक देऊन महिला पोलिसास फरफटत नेणाऱ्या कारचालकाला पकडण्यात पोलिसांना यश

पुणे : दारु पार्टी केल्यानंतर घरी जात असताना नाकाबंदीमधील महिला पोलिसांनी थांबविल्यावर दारु पिल्याचे समजू नये, म्हणून बॅरिकेटला धडक देऊन महिला पोलिसास फरफटत नेणाऱ्या कारचालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अर्णव पवनकुमार सिंघल (वय २४, रा. जनवाडी, मुळ रा. जिंजर अपार्टमेंट,फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) असे या कारचालकाचे नाव आहे.
एस एस पीएम एस कॉलेज समोर रविवारी रात्रीपासून नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटे दीड वाजता एका कारला पोलीस अंमलदार दिपमाला राजू नायर यांनी थांबण्याचा इशारा केला. तेव्हा कारचालकाने बॅरिकेटला धडक देऊन नायर यांना फरपटत नेले होते. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.
अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त
निखिल पिंगळे यांनी युनिट १, युनिट २ व युनिट ४ यांना तसेच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी समांतर तपास करण्याचे आदेश दिले.महिला पोलीस अंमलदार नायर यांना जखमी करणारी कार कोरेगाव पार्क येथील हॉटेलमधून आल्याचे दिसून आले. तेव्हा युनिट २ चे पथकाने अपघातील कारचालकाची माहिती काढली. कारचालक हा जनवाडी भागात राहणारा आहे. ही कार खडकी टाईप रेंज हिल्स भागात असल्याची माहिती
मिळाली. अपघातातील कार बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे हे पथकासह जनवाडी भागात पेट्रोलिंग करुन अपघात करणाऱ्या कारचालकाचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, अपघात करणारा आरोपी जनवाडी येथून गावी जाणार आहे. लागलीच बातमीच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी अर्णव सिंघल याला ताब्यात घेतले. अपघाताबाबत त्याला विचारणा केली असता त्याने सांगितले की आम्ही मित्रासह कोरेगाव पार्क येथे पार्टी करण्यासाठी गेलो होतो. पार्टीनंतर घरी जात असताना एस एस पी एम एस कॉलेजवळ पोलिसांनी आमची कार बाजुला घेण्यास सांगितली असता मी तेथे लावलेल्या बॅरिकेटसला धडक देऊन तेथून पळून गेलो असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *