- December 11, 2024
- No Comment
पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार
पुणे: पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत संदीप सुनिल कवाळे (वय २७, रा.आंबेडकर चौक, औंध रोड, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिजीत प्रदिप मोरे (वय ३८, रा. चव्हाण वस्ती, बोपोडी) याला अटक केली आहे. हा प्रकार बोपोडीतील भाऊ पाटील रोडवरील साई मंदिर येथे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कवाळे आणि अभिजीत मोरे यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. संदीप कवाळे हा भाऊ पाटील रोडवर रात्री आला असताना अभिजीत मोरे याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.