- December 14, 2024
- No Comment
सराईत गुन्हेगार कडुन अंमली पदार्थाच्या तस्करीत पुण्यात गांजा घेऊन येताना अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पुणे : सराईत गुन्हेगाराकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. साहिल विनायक जगताप (वय २८, रा. हनुमाननगर, केळेवाडी, कोथरुड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधक पथक लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना माहिती मिळाली की, सोलापूर रोडवरील लोणी टोलनाक्याजवळ अंमली पदार्थ घेऊन एक जण येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी लोणी टोलनाक्याजवळील रेड्डी हॉटेल शेजारी सापळा रचला. तेथे आलेल्या साहिल जगताप याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडील सॅकमध्ये ३ लाख १३ हजार ८४० रुपयांचा १४ किलो १८२ ग्रॅम गांजा तसेच इतर ऐवज मिळून आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत खोसे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बांगर, भगत यांनी केली.