• December 17, 2024
  • No Comment

दारू पित असताना झालेल्या वादातून डोक्यात सिलेंडर घालून एकाचा खुन; आळंदीतील काळेवाडी येथील घटना, आरोपी गजाआड

    आळंदी: दारु पित बसले असताना झालेल्या वादातून मजुराच्या डोक्यात सिलेंडर घालून त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

    संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. काळेवाडी, धाकट्या पादुका मंदिराशेजारी, आळंदी) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी गणेश खंदारे (वय २३, रा. काळे कॉलनी, चर्‍होली, मुळ रा. वाशीम) याला अटक केली आहे. ही घटना संतोष खंदारे याच्या घरी रविवारी सायंकाळी सात वाजता घडली.

    याबाबत बद्री विठ्ठल चव्हाण (वय ३५, रा. काळे कॉलनी, चर्‍होली, ता. हवेली) यांनी दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खंदारे आणि गणेश खंदारे हे दोघेही मजुर आहेत. ते रविवारी सायंकाळी संतोष याच्या घरी दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात गणेश याने घरातील सिलेंडरच्या सहाय्याने संतोष खंदारे यांच्या डोक्यात मारला. त्यात संतोष जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला.

    पोलिसांनी गणेश खंदारे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक रणवरे पुढील तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *