• December 17, 2024
  • No Comment

मांजरी परिसरात गावठी दारु अड्ड्यावर छापा; गुन्हे शाखा युनिट 6 ची उल्लेखनीय कामगिरी

मांजरी परिसरात गावठी दारु अड्ड्यावर छापा; गुन्हे शाखा युनिट 6 ची उल्लेखनीय कामगिरी

    थेऊर: मांजरी खुर्द गावच्या हद्दीत गोदरेज बांधकाम साईटजवळ ओढ्यालगत गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. रविवारी (ता.16) हि कारवाई करण्यात आली आहे.

    या कारवाईत पोलिसांनी 35 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, 4 हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा 1 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बन्सीलाल शांतीलाल कर्मावत (वय – 50 रा. उंद्रे पेट्रोल पंपासमोर मांजरी ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना मांजरी खुर्द गावच्या हद्दीत गोदरेज बांधकाम साईटजवळ ओढ्यालगत गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. सदर ठिकाणी पथकाने अचानकपणे छापा घातला.

    यावेळी सदर ठिकाणी 35 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व 4 हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 18 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी सदर भट्टी चालकाबाबत माहिती घेतली असता सदर भट्टी ही बन्सीलाल कर्मावत हा लावत असलेबाबत माहिती पोलिसांना मिळाली. कर्मावतच्या विरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ) व (फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    सदरची कामगिरी युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण युनिट -6 यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर ऋषीकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *