• December 17, 2024
  • No Comment

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, कैद्याला बेदम मारहाण प्रकरणात दोघांवर गु्न्हा दाखल

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, कैद्याला बेदम मारहाण प्रकरणात दोघांवर गु्न्हा दाखल

    पुणे: किरकोळ वादातून येरवडा कारागृहातील कैद्याला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुधीर गौतम थोरात असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

    याप्रकरणी कारागृहातील कैदी विकी उर्फ विवेक राजेश खराडे, अली अदम शेख यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत कारागृहातील रक्षक विश्वास वाकडे (वय ४३) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बराकीत १४ डिसेंबर राेजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कैदी सुधीर थोरात याला विकी खराडे, अली शेख यांना अडवले. ‘कारागृहातून कधी सुटणार?’, अशी विचारणा केली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.

    वादातून खराडे आणि शेख यांनी थोरात याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत थोरात याची बरगडी, तसेच नाकाला दुखापत झाली. कारागृहात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी त्वरीत तेथे धाव घेतली. थोरातला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्रथमोपाचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर यांनी कारागृहास भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत. येरवडा कारागृहात यापूर्वी कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. हाणामारीच्या घटना, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *