• December 17, 2024
  • No Comment

वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर भागात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यश अनिल कुंभार (रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

    याप्रकरणी अक्षय आबासाहेब सरोदे, भु्त्या उर्फ रोहित बाबासाहेब काते (दोघ रा. डायस प्लाॅट, गुलटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश याची आई मंजू अनिल कुंभार यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश याचा आरोपी अक्षय आणि रोहित यांच्याशी वाद झाला होता. यश, त्याचे मित्र निखिल भिसोरे, कैलास बनसोडे हे सोमवारी गुलटेकडीतील कटारिया शाळेसमोर मोबाइलवर गेम खेळत होते. त्यावेळी अक्षय आणि रोहित तेथे आले. त्यांनी यश आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ केली. यश याच्या पाठीवर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *