• December 17, 2024
  • No Comment

वायफळे येथील खूनाप्रकरणी पुण्यातील तीन आरोपी जेरबंद; तर दोन पोलिस निलंबित

वायफळे येथील खूनाप्रकरणी पुण्यातील तीन आरोपी जेरबंद; तर दोन पोलिस निलंबित

    तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके यांच्या खूनप्रकरणी आणखी तिघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एक अल्पवयीन आहे. तासगाव पोलिस व सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे परिसरात ही कारवाई केली आहे.

    याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात नऊ संशयितांचा सहभाग समोर आला असून आणखी पाच जणांचा शोध पोलिस घेत आहेत.

    अनिकेत संतोष खुळे (१९, रा. कात्रज, पुणे) व आकाश महिपत मळेकर (२०, रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यालयाने त्यांना १९ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित विशाल सज्जन फाळके याला यापूर्वी- अटक करण्यात आली आहे.

    *तासगाव पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निलंबित*

    वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित विशाल सज्जन फाळके याला पूर्वीच्या गुन्ह्यात वेळेवर वॉरन्ट न बजावल्याने, कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत तासगाव पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी निलंबनाचा बडगा उगारला. पोलिस हवालदार वेदकुमार धोंड व पोलिस कॉन्स्टेबल पवन जाधव अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *