• December 18, 2024
  • No Comment

नृत्य प्रशिक्षकाकडून बालिकेशी अश्लील कृत्य

नृत्य प्रशिक्षकाकडून बालिकेशी अश्लील कृत्य

    पुणे: वारजे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य प्रशिक्षकाने चार वर्षांच्या बालकेशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारून कारवाईची मागणी केली.

    याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा नृत्य प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनंतर पालकांनी बुधवारी (१८ डिसेंबर) शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. समाज माध्यमातून संदेश पाठवून शाळेत जमण्याचे आवाहन पालकांकडून करण्यात आले आहे.

    नृत्य प्रशिक्षकाने चार वर्षांच्या बालिकेशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याबाबत बालिकेने पालकांकडे तक्रार केली. या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला. नृत्य प्रशिक्षकाला शाळेतून काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे संबंधित शाळेने स्पष्ट केले.

    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून याप्रकरणाची चाैकशी करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून नृत्य प्रशिक्षकाला अटक करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *